तुझ्या माझ्यासवे कधी गायचा पाऊस ही
तुला बोलावता पोहोचायाचा पाऊस ही !
पडे ना पापणी पाहून ओले ती तुला,
कसा होता नि नव्हता व्हयायचा पाऊस ही !
तुला मी "थांब" म्हणताना, तुला आडवायला,
कसा वेळीच तेव्हा यायचा पाऊस ही !
मला पाहून ओला विरघले रुसवा तुज़ा,
किती युक्त्या मला शिकवायचा पाऊस ही !
कशी भर पावसात ही आग माझी व्हायची
तुला जेव्हा असा बिल्गायचा पाऊस ही !
आता शब्दांवारी या फक्त उरलेल्या खुणा
कधी स्मरणे अशी ठेवायचा पाऊस ही....!
Wednesday, January 28, 2009
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment